गावातल्या मुलींच काय?
गावात आता शिक्षण पोचलय। नाही म्हटल तरी माध्यमिक शाळा तालुका पतळीवर व् मोठ्या गावांमाधेही बघायला मिळतात। याचाच अर्थ खेड्यापाड्यात लोकांना आपापल्या मुलांना शाळेच शिक्षण मिळाव अशी इच्छा आहे अस दिसतय। प्राथमिक शाळेतली मुलमुली पाच पाच, दहा दहा मैल पायी चालत, बस असेल तर बस मधून, सायकलवरून, प्रसंगी नदी ओलांडून शाळेच्या वेशीत दाखल होतात तेव्हा त्यांच्या जिद्द आणि महत्त्वाकांक्षेकडे दुर्लाक्षून चालात नाही. गावात मुलींच्या शिक्षणाच प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी आहे। तरी देखील नगण्य नाही। पालकांच्या अपेक्षा मुलाकडून जास्त असल्या तरी मुलीला किमान शिक्षण मिळाल पाहिजे अशी मानसिकता आज खेड्यातल्या पालकाची दिसते तेव्हा प्रश्न वेगळेच उभे रहातात। मुलीला किती शिकवायच? प्राथमिक शाळा घराजवळ , चालत जायच्या अंतरावर असते पण माध्यमिक शाळा घरापासून थोड़ी दूर, कुठल्यातरी वाहन-साधनाच्या मदतिनेच गाठावी लागते.
शहरात शाळा उदंड , विद्यार्थी उदन्ड आणि फी देखील उदंड! तरी देखील मध्यमवर्गीय घरात मुलीला कोलेजपर्यंत शिकवण्याची परवानगी आहे। कमीतकमी १२वी तरी। शाला कोलेजपर्यंत जायच्या सोयीही भरपूर आहेत। स्वत:च वाहन, बस,सायकल, रिक्शा। शहरात या सर्व साधनांचा मुली वापर करतात। सुरूवातीला सवयलागेपर्यंत पालक सोडतात पण नंतर मुली स्वत:च शिकतात आणि स्वतंत्रपणे जा-ये करतात।
गावात माध्यमिक शाळा आहे तशीच शहरात आहे। गावात जे अभ्यासक्रम आहेत तेच शहरात आहेत। त्यामुळे शिक्षणाच सरवत्रिकीकरण झालय अस दिसतय। पण...वस्तुस्थिती आणि परिस्थिती यांच्यात , तसच शिक्षणात अंतर फार जास्त आहे। मुलींना शाळेत जाऊन कळत ( जस मूलाना कळत) की शाळेत खूप नव्या गोष्टी बघायला/ऐकायला/ करायला मिलातात। त्यासाठी अभ्यास करावा लागतो। नविन काहीतरी कळण्यात एक आनंद तर असतोच पण त्यात एक power असते। ज्यामुले अगदी सर्वसाधारण प्रश्न पडायला प्रेरणा मिलते। विचार करायला वेळ द्यावा लागतो। शिक्षकांची मदत , सोबात लागते। मित्र-मैत्रिणिशी गप्पा माराव्या लागतात। त्यासाठी निवांत भेटण्याची-बसायची जागा असावी लगते।
शहरातल्या मुलीना ह्या ज्ञानप्रक्रियेतून जायची संधी असते। सगळ्यांना नाही तरी बऱ्याच मुलींना ती मिळते। मैत्रीणीकडे जाण्यासाठी सायकल असणे आणि भरकन जता येणे ही मुभा त्यांना बरेचदा असते। त्यामुळे शिक्शणामधे अपेक्षित बाह्य परिस्थितीची अनुकूलता शहरात मिळताना दिसते।
गावात शिक्षनाच सर्वत्रीकीकरण झालय तरी गावातल्या मुलींकडे त्या शिक्षनाला लागणार्या अपेक्षित स्वातंत्र्याची , सोयींची उपलब्धता आहे का? शिक्षणाच्या सर्वत्रिकीकरणतून गावातही ही गरज निर्माण झालिये। एका गावातून दुसर्या गावात जाव लागण ही आता गावाची गरज आहे। शहरात अशी १० गाव बसतात। त्यामुळे अंतर गावांच नसत तर किलोमिटरच असत। त्यामुळे शिक्शणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबर शहरीकरणाचा बदल गावाला स्वीकारावा लागेल का?
No comments:
Post a Comment