Amendment झाली रे!
प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम! फक्त नजर प्रेमाची मग घरदार, पैसा सम्पत्ती कही नको। हा समाज , ही दुनिया प्रेमाच्या विरोधात असते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला धर्म-जात-वंश-रंग वर्ज्य असते। आणि अवर्ज्य असते ते हृदयातील प्रेम! जे कोणी ते देईल आणि घेईल ते जन्मानूजन्माचे सोबती बनतील। अस हे निस्सीम प्रेम! समाजाच्या कुठल्याही सबबीला ठोकर मारणार, रगेल, तख्तोताज यांना धुळीला मिळवण्याची ताकद असण्याची घमेंड बाळगणार आणि त्याला खरही करून दाखवणार! समाजात आपले आई वडील आलेच । त्यांना देखील वेडात काढणार, त्यांची मालकी नाकारणार, वेळप्रसंगी जीव देऊन आपल्या प्रेमातील खरेपणा आणि त्याच पावित्र्य जपणार प्रेम, घराणेशाही, जातपात, खानदान या पैसा आणि मानापमानावर पोसलेल्या नकली वरूळाला आपल्या मिलानातून प्रेमिक नेस्तनाबूत करू शकतात। अस वेड , अशी अनावर ओढ़ , अशी भक्ती केवळ प्रेमिकच करू जाणे! प्रेमाची थोरवी आजपर्यंत अनेक चित्रपटांनी गायली आहे। प्रेमाला शिरोधार्य मानून बाकी सगळ शून्य मानल आहे। समाजात प्रेम करण हा प्रश्नच आहे। प्रेमविवाह किवा मुलामुलीने आपल्या पसंतीने लग्न करणे हे अजूनही अमान्यच आहे। पूर्वीही होते। या समाजाला जणू खजील करण्यासाठी आणि या वृतीची वासलात लावण्यासाठी " विरोध होत असेल तर घरातून सरळ पळून जा" असा खमकी सल्ला चित्रपट देत होता। शेवटी घरच्यांना नाक घासत याव लागताच किवा येतीलच , काळजी नसावी अशी खात्रीही चित्रपट देत होता। वास्तवात किती प्रेमीयुगुलानी हा सल्ला मनाला हे ज्याच त्यालाच माहित। पण प्रेमविवाह ही बंडखोरी होती हे नक्की! कुटुम्बव्यवस्थेत लग्न ठरवताना जात-गोत्र-ग्रह- नाडी असे सगळे अदृश्य घटक दृश्य मानासांपेक्षाही महत्वाचे ठरतात। एकेकाळी एकमेकांना लग्नाआधी पहाण्याचीही संधी नसे त्या समाजात असे उघडपणे हात पकडून मिठीमारून, गाणी म्हाणून आपले ( शारीर)प्रेम दखवण म्हणजे चित्रपटानी समाजाची खरोखरच....काढली आहे। तो त्यांचा व्यवसाय होत, असो, तरीदेखील प्रेमाला नकार देणार्यांची त्यानी ऐशीतैशी केली आहे। मात्र हे चित्रपट बघून बघून आपला समाज आता शहाणा चतुर झालेला आहे। लग्नव्यवस्थेला विरोध आजही खपत नाही। त्यातून मुलामुलीने आपापल्या पसंतीने लग्न म्हणजे जात-धर्माची वाट लागली। त्यापेक्षा लग्नाच्या आधी घरच्यानी पसंत केलेल्या मुलामुलींना लगनाआधी भेटून देऊन , लग्नाची घाई न करता त्यांना एखादा महीना गाठीभेटी घेण्याची ( आईवडीलान्च्या परवानगीने) मुभा दिली तर काय हरकत आहे? बंड रोखल जाईल, घराची अब्रू वाचेल, जातीत लग्न होईल असे फयदेच फायदे!... तर, आजच्या लग्नात अशी adjesment झाली आहे। मुलामुलींचा होकार आता ग्राह्य मानला जात आहे। म्हणून आता आपला सिनेमाही जमान्याला " जालीम ज़माना" म्हणून स्वत:च " मागसलेपण " टिकवू इछित नाही। कारण जालिम ज़माना आता "नरम" झालाय आणि लग्नाआधी भेटण्याची माफक अपेक्षा पूर्ण करतोय। मग आजच्या सिनेमात आईवडीलांना न दुखावता, पळून न जाता, दुनियेला लाथ न मारता, संपत्तीला न ठोकरता लग्न होतय, हीरो हिरोइन कुटुंब जपण्याला महत्त्व देतायेत आणि समाजात आणि चित्रपटात मांडवली झालिये, Amendment झालिये!